हनुमान मंदिर जीर्णोदारासाठी १४ लाखाचा निधी,आ.विनोद अग्रवाल यांचे पुढाकार

0
74

गोंदिया : शिव मंदिर चौक येथील हनुमान मंदिराचे जीर्णोदार करण्यात यावे, यासाठी वृक्षधरा फाउंडेशनचे सहसंस्थापक नितेश बारेवार यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या संदर्भात आ.विनोद अग्रवाल यांनी सकारात्मक भुमिका घेत मंदिर जीर्णोध्दारासाठी १४ लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
वृक्षारोपण चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या वृक्षधारा फांऊडेशन सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. याच अनुसंगाने नागराधाम शिवमंदिर तसेच परिसरातील अनेक कामांसाठी पुढाकार घेत असते. याअनुसंगाने शिव मंदिर चौक येथील हनुमान मंदिराचे जीर्णोदार करण्यात यावे, या मागणीला घेवून फाउंडेशनचे सहसंस्थापक नितेश बारेवार यांनी आ.विनोद अग्रवाल यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुरूप आ.विनोद अग्रवाल यांनी सकारात्मक भुमिका घेतली. व शासनस्तरावरून हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी १४ लाखाचा निधी मिळवून दिला आहे. या निधीतून लवकरच जीर्ण झालेल्या मंदिराचे जीर्णोध्दार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, यापुर्वीही वृक्षधारा फाउंडेशनचे संस्थापक ओम बारेवार यांच्याशी चर्चा करून शिवमंदिर एलईडी गार्डनचे काम १० लाख रूपयाच्या निधीतून पूर्ण करण्यात आले. तर शिवमंदिर शेड नुतनीकरणासाठी १५ लक्ष रूपये, तर आता हनुमान मंदिर जीर्णोध्दारासाठी १४ लक्ष रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे वृक्षधारा फांऊडेशन व नागरिकांनी आ.विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहे.
त्याव्यतरिक्त गतवर्षी वृक्षधरा फाऊंडेशनतर्फे बडी गल्ली रोड, शिवमंदिर चौकातील आंगणवाडीच्या कंपाऊंड वॉलचे सुशोभीकरण करण्याची मागणी सरपंचांना करण्यात आली होती, त्यातही ग्रामपंचायत नागरधामच्या सरपंचांनी ही मागणी पूर्ण केली असून ती पूर्ण करण्याचे कामही युद्ध पातळीपासून सुरू आहे.