व्यसनमुक्त पहाट २0१६ : बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूलचा उपक्रम

0
26

गोंदिया : व्यसनाधिनतेमुळे समाजापुढे निर्माण होणार्‍या किळसवाण्या चित्राला हटविण्यासाठी समाजमन व्यसनमुक्त करण्यासाठी साधूसंतांचे विचार लोकांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे. चरित्रवान व व्यसनमुक्त पिढी तयार करण्यासाठी गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेद्वारे संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र कुडवा व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त पहाट २0१६ कार्यक्रम येथे पार पडला.
अतिथी म्हणून कामठा लहरी आश्रमातील तुकड्याबाबा खरकाटे, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, सारसमित्र सावन बहेकार, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, सेवानवृत्त प्राचार्य श्यामराव बहेकार, झामसिंग टेंभरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, प्रा. सविता बेदरकर, प्राचार्य नेहा थुल, प्राचार्य वैशाली वैद्य, कल्पना बाहेकर, प्रा. रामकृष्ण चौधरी, संजय बाहेकर, गजेंद्र फुंडे, नीलेश शिवणकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षारंगी व्यसनमुक्त पहाट कार्यक्रम घेण्यात आले. यात ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार मॉडेल शाळेचे विद्यार्थी व राधाबाई बाहेकर नर्सिंग शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.वर्धा येथील सप्तखंजरी वादक इंजि. भाऊसाहेब थुटे महाराज यांनी राष्ट्रसंताचे विचार सांगत व्यसनमुक्तीवर समाजप्रबोधन करून मनोरंजनात्मक कीर्तन सादर केले.भ्रष्टाचार, व्यभिचार, अन्याय, अत्याचार आदी सामाजिक समस्यांची सहजसोप्या भाषेत माहिती दिली. सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी व सुसंस्कारित चरित्रवान पिढी निर्माण करण्यासाठी देशाला राष्ट्रसंतांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी संस्था सचिव विजय बाहेकर, सेवानवृत्त प्राचार्य श्यामराव बाहेकर व सर्व अतिथींच्या हस्ते संत तुकड्याबाबा खरकाटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन व आभार महेश भालोटिया यांनी केले. कार्यक्रमासाठी बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी व राधाबाई बाहेकर नर्सिंग शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतरांनी सहकार्य केले.