देवरीत समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ

0
18

देवरी दि.५:: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ रविवारी (दि.३) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला.
देवरी तालुका भाजप महिला आघाडी व माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद््घाटन क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार व दीप प्रज्वलित करुन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती देवकी मरई, माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम, पंचायत समिती सदस्य सुनंदा बहेकार, नगरसेविका कौशल्या कुंभरे, गीता भेलावे, कोकीळा दखने, भूमिता बागडे, सुनिता गावळ, संतोष तिवारी, संजू उईके मंचावर उपस्थित होते.
यावेळी नारी शक्तीला सलाम करीत भाजप महिला पदाधिकार्‍यांचा शाल व श्रीफळ देवून आ. पुराम व सविता पुराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आ. पुराम यांनी, शिक्षेची आद्यदेवता म्हणून सावित्रीबाईची ओळख आहे. जर त्यांनी महिलांना शिकविले नसते तर आज देशात महिला समोर गेल्या नसत्या. आज सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घेवून सामाजिक कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजिका माजी सभापती पुराम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.