निमा भंडाराचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार

0
18

◆ अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी स्विकारला सत्कार

लाखनी:मागील वर्षी 23 मार्चला शहीद दिनाच्या निमित्ताने NIFAA व निमा केंद्रीय शाखेतर्फे आयोजित “संवेदना” या महारक्तदान शिबीराला ज्या NIMA शाखेने उत्कृष्ट सहकार्य केले व कोरोना काळात देशात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अत्यंत गरजेच्या वेळी रक्तदान शिबिर आयोजित करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली त्या उत्कृष्ट निमा शाखेचे व काही सामाजिक संघटनेचे जागतिक आरोग्य दिनी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात निमा भंडारा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी सत्कार स्वीकारला.

निमा भंडाराच्या वतीने सातत्याने आरोग्य शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, ग्रामीण भागातही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा देण्याचे कार्य डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या नेतृत्वात नीमा भंडाराने केले. गेल्या 6 वर्षात डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या नेतृत्वात निमा संघटनेच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना वैद्यकीय सुविधा देता याव्यात यासाठी निमा भंडारा सातत्याने कार्यरत आहे.

निमा सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर आणि निमा महाराष्ट्र राज्य डॉ. सुहास जाधव, डॉ. अनिल बाजारे यांचेही सहकार्य आणि मार्गदर्शन सातत्याने लाभत असते.

प्रतिक्रीया:
हा सत्कार ज्यांनी संघटनेला आजवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांच्यासह सर्व निमा सदस्यांचा आहे. त्यासाठी मी सर्व सन्माननीय सदस्यांचे, रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक वर्ष आम्ही सर्व डॉक्टर्स आणि आमचे सहकारी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना हा सत्कार आम्हाला प्रेरणा देणारा आहे.

डॉ. चंद्रकांत निंबार्ते,अध्यक्ष, नीमा भंडारा