‘त्या’ वस्तूंबतूंद्दल एका आठवड्यात निष्कर्ष- ISRO

0
44

चंद्रपूर,दि.08ः आज, शुक्रवारी दुपारी 12 वाजता ISRO इसरोच्या बेंगलोर स्थित अवकाश संस्थेचे वैज्ञानिक एम.शाहजहान आणि मयुरेश शेट्टीे हे जिल्ह्यातील सिंदेवाही येथे दाखल होत त्यांनी अवकाशीय वस्तूंची पाहणी केली.पाहणीनंतर येत्या आठवडाभरात संशोधन करून निष्कर्षापर्यंत पोहचू असे सांगितले.2 एप्रिलला सिंदेवाही परिसरात पडलेल्या ‘सॅटेलाईट रॉकेट बूस्टर’चे अवशेष पाहण्यासाठी ते आले होते.यावेळी स्कायवाच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश
चोपणे हेही उपस्थित होते.त्यांनी पोलिस ठाण्यात ठेवलेल्या 6 सिलेंडर्स आणि रिंगची पाहणी केली.
फ़ोटो आणि व्हिडीओ घेतले तसेच लाडबोरी गावातील लोकांशी चर्चा केली. हे अवशेष सॅटेलाईट रॉकेट बूस्टरचे असल्याचे ISRO चे वैज्ञानिकांनी सांगितले.परंतु सिलेंडर्स मध्ये कोणते इंधन होते हे प्रयोगशाळेच्या तपासणीनंतरच सांगता येईल असे ते म्हणाले. हे अवशेष इसरोच्या कंटेनरमध्ये आजच नेले जाईल. ते कुण्या देशाचे आहे, कुणाची जबाबदारी आहे, हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला.ला.