जेष्ठ नागरिकांचे जनजागृती व आरोग्य शिबीर संपन्न

0
19

वाशिम,दि.०९ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे आज ९ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक जनजागृती व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी गोपाळराव आटोटे गुरुजी व रामबकस ढेंडुळे, शिवमंगल राऊत,श्री.खडसे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे मानकरी अविनाश कांबळे, श्रीमती बेबीताई कांबळे व चंद्रभान पोळकर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी समाज कल्याण विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना व कायदे याबाबत माहिती देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी कलावंत के.के.डाखोरे व त्यांच्या सहकलावंतानी तसेच बेबीताई कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकसंगीताच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.
गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती देवून त्यांचे विचार समाजात रुजविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
जि.प.चे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना उद्भवणा-या विविध आजारांबाबत तसेच त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन करुन आरोग्य शिबीरामध्ये तपासणी करण्याचे आवाहन केले.
संचालन शुभम गायकवाड व धिरज अवधुत वरघट यांनी केले.आभार संध्या देखणे
यावेळी सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सुनिता राठोड,वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्री.चोंडकर,कल्याण निरीक्षक संजय निमन ,संध्या राठोड,सहकारी ब्रिक्स इंडिया प्रा.लि.पुणेचे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड व त्यांचे सहकारी तसेच समाज कल्याण विभागाचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.