११ ते १३ एप्रिल दरम्यान जलद सर्वेक्षण व किटकजन्य आजार जनजागरण मोहिम

0
16

गोंदिया,दि.10 : जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया/शहरामध्ये ११ एप्रिल ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत किटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

         सदर मोहिमेमध्ये आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन ताप सर्वे,कंटेनर सर्वे व लोकांमध्ये किटकजन्य व जलजन्य आजाराविषयी तसेच कोरडा दिवस पाळण्याविषयी जनजागृतीचे काम करणार आहेत. गृहभेटी दरम्यान कंटेनर सर्वेक्षण करुण दूषीत कंटेनर मध्ये अळीनाशक टेमीफास टाकने तसेच दूषीत कंटेनर घरमालकांना दाखवून रिकामे करण्याचे काम या मोहिमेमध्ये केले जाणार आहे. कोणताही ताप हिवताप असू शकतो व लवकर निदान तात्काळ उपचार या उक्ती प्रमाणे ताप आलेल्या रुग्णाचे हिवतापाकरीता रक्त नमूणे घेऊन तात्काळ निदान आरडीके किटद्वारे केले जाणार आहे.  हिवताप,डेंग्यू आजारापासून बचाव करण्याकरीता आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा म्हणजे घरातील पाण्याची सर्व भाडी घासून पूसून कोरडे करुण ठेवायचे ड्रम, कूलर पाण्याच्या टाक्या, रांजन, माठ, फूलदान्यातील साचलेले पाणी रीकामे पडलेले टायर नारळाच्या करवंटया यासारख्या टाकावू वस्तूमध्ये पाणी साचू दयायचे नाही. जेणेकरुण डासांची उत्पत्ती होणार नाही. तसेच झोपतांना नियमित मच्छरदानीचा वापर करावा, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधावी, ताप आल्यास जवळच्या दवाखाण्यात जावून तात्काळ रक्त तपासणी करुण उपचार घ्यावा. कोणताही ताप अंगावर काढू नये व घराबाहेर साचलेल्या पाण्यामध्ये गाडीचे जळालेले इंजीन ऑइल टाकण्याबाबद माहिती दिली. तसेच जनतेच्या सहभागानेच किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे डॉ.चौरागडे म्हणाले. याकरीता आरोग्य विभागाकडून सूरु असलेल्या जनजागरण मोहिमेला जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे