महात्मा जोतीराव फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन

0
12

नगरपंचायत आणि भाजप कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
अर्जुनी मोरगाव-भारतातील महिलांचे उद्धारकरते,सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शैक्षणिक क्रांती घडविणारे आद्य शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तालुक्यात उत्साहात साजरी झाली. नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मंजुषा बारसाकडे यांच्या उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष ललिता टेंभरे, नगरसेवक यशकुमार शहारे, विजय कापगते ,संजय पवार, राधेशाम भेंडारकर ,अतुल बनसोड, नगरसेविका सपना उपवनसी, इंदू लांजेवार, लेखापाल प्रफुल गाडबैल,तुषार सांगोडे ,दीपक राऊत ,सुरेश बोरीकर आणि कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक भाजपा कार्यालयात जि.प.सदस्य रचना गहाणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.जिपचे गटनेते लायकराम भेंडारकर,डॉ.गजानन डोंगरवार, माजी तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार,पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनवाणे,संदीप कापगते, व्यंकट खोब्रागडे,दीपंकर उके,डॉ.गुरनुले उपस्थित होते.

वाशिम, दि.11- थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक राहूल वानखेडे,लेखाधिकारी यूसूफ शेख,स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण व अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सुध्दा महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.