महात्मा फुलेच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
35

सडक अर्जुनी : (१३ एप्रिल)- समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, विषमता, गुलामगिरी, यांसारख्या समाजविघातक चालीरितींना विरोध करून, सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणारे,महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी अनेक कामे करणारे,अविरतपणे समाजकार्य करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले हे कायमच आदर्श आहेत.जीवनात महात्मा फुलेच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे विचार माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री तथा जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर,ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत धानगाये,जिवन लंजे,तालुकाध्यक्ष अशोक लंजे,जिल्हा अनुसुचित आघाडी जे डी जगनित,जिल्हा परिषद सदस्य डाॅ लक्ष्मण भगत,डाॅ.भुमेश्वर पटले,कविता रंगारी,चंद्रकला डोंगरवार,निशा तोडासे,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष छाया चौव्हाण,तालुका महामंत्री गिरधारी हत्तीमारे,परमानंद बडोले,शिशिर येळे,गिरधारी बघेले,डाॅ बबन काबळे,योगराज पारधी,सदु विठ्ठले,गौरेश बावनकर,शैलेश शहारे,महीला तालुकाध्यक्ष पदमा परतेकी,पंचायत समिती गटनेते शालीदर कापगते,पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये,दिपाली मेश्राम,संगीता खोब्रागडे,वर्षा शहारे,सपना नाईक,प्रल्हाद कोरे,मदन साखरे,चरण शहारे,सुशील लाडे,प्यारेलाल गौतम,जागेश्वर पाथोडे,शुभम जनबंधु आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.