लोडशेडिंगच्या विरोधात भाजपा किसान मोर्च्याचा एल्गार,अधीक्षक अभियंत्याचा केला घेराव

0
58

लोडशेडिंग त्वरित बंद करण्याची शिशुपाल पटले यांची मागणी.
भंडारा- भाजपा किसान मोर्च्या च्या शिष्टमंडळाने आज लोडशेडिंग च्या विरोधात विद्युत वितरण कंपनी भंडारा चे अधीक्षक अभियंता चे घेराव केले.मागण्या पूर्ण होईपर्यंत कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका किसान मोर्च्यांचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले यांनी घेतली. शिष्टमंडळाचा वाढता आक्रोश पाहून अधिकाऱ्यांना आपल्या वरिष्ठांशी बोलावे लागले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड कारण्यात आली आहे.आता धान पीक गर्भावस्थेत असतांना विज वितरण कंपनी कडून गत ५ दिवसांपासून कृषी फिडरला २१ तासाचे भारनियमन केले जात आहे.यावर्षी च्या खरीप हंगामातील कमी फसलीमुळे,जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसानी मुळे, वेळेवर न होणारे धानाचे चुकारे,राज्य सरकार कडून बंद केलेला बोनस अशा अनेक कारणांनी शेतकरी आर्थिक अडचणीत असतांना सरकारने येन रोवणीचे वेळी विजेचे कनेक्शन कापुन त्यांच्या अडचणीत भर टाकली. पुन्हा ५ दिवसापांसुन आकस्मिक भारनियमनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना फक्त 2 ते 3 तासच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दिड महिन्यापासून मेहनत करून हातात आलेले उन्हाळी धान पीक संपुष्टात येऊन शेतकऱ्यांचा वर्षभराचा घास हिरावला जाणार आहे.
सरकारचा निष्काळजीपणा व चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांवर हे संकट आले आहे. महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पीक पद्धत वेगळी व जास्त पाण्यावर आधारित असल्याने भारनियमनाचे निकष ह्या जिल्ह्यासाठी वेगळे ठेवावे व हे भारनियमन त्वरित बंद करावे ह्या मागणीसाठी आज भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा अध्यक्ष हरेंद्र रहांगडाले,भंडारा शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, भंडारा ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते यांचे नेतृत्वात विद्युत वितरण कार्यालय भंडारा येथे अधीक्षक अभियंता यांचा २ तास घेराव करण्यात आला. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहिल्यावर अधीक्षक अभियंतांना शासनाशी व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करावी लागली. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन वरिष्ठांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर घेराव तूर्तास मागे घेण्यात आला.लोडशेडिंग पासून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.किसान मोर्च्याच्या शिष्टमंडळात मुन्ना पुंडे,भगवान चांदेवार,बाबू ठवकर,गणेश कुकडे, यादोराव मुंगमोडे,अरविंद पटले,रामू बदने,संतोष त्रिवेदी,शामभाऊ खेडीकर,भोजराम भार्रे,सुभाष बोरकर,बंटी बानेवर,जगदीश गोबाडे,देविदास कुंभलकर, संजय सेलोकर,सुखदेव राऊत,प्रीतीलाल पारधी,गणेश तुमसरे,माला बगमारे, गीता सीदाम,मधुरा मदनकर,रोशनी पडोळे,दीनानाथ पटले, नीलकंठ कायते,भुपेंद्र पारधी,सहादेव ढबाले,घनशाम पारधी,देणीप्रसाद पारधी,व शेकडो शेतकरी उपस्थित होते.