चिखलाने माखलेले ट्रक्टर रस्त्यावर आणणार्या चालक मालकावर कारवाई करा-काँग्रेसची मागणी

0
555

गोंंदिया,दि.११- शेतातून चिखलणी करून आलेल्या ट्रॅक्टरची माती वाहतुकीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडून असते आणि या मातीवरून शाळकरी विद्यार्थी, अबाल वृद्ध नागरिक आणि महिला भगिनी दुचाकीवरून पडल्याच्या घटनामध्ये हल्ली मध्ये फार वाढ झाली आहे.अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाल्यामुळे बऱ्याच लोकांना रुग्णालयात भरती होऊन उपचार सुद्धा घ्यावे लागले.सध्या परे रोवणीचे काम चालू आहे.ट्रॅक्टर चालक चिखल झाल्यावर मातीने माखलेला ट्रॅक्टर वर्दळीच्या रस्त्यावर आणत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याने त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर चालकांनी वर्दळीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणण्यापूर्वी आपला ट्रॅक्टर मध्ये फसलेली माती किंवा चिखल काढून टाकला पाहिजे जेणेकरून ट्रॅक्टरची माती रस्त्यावर पडणार नाही. परंतु इतरांची काळजी न करता बहुतांशo परवाना नसलेले ट्रॅक्टर चालक मुजोरीने ट्रॅक्टरची माती रस्त्यावर टाकत चालत असतात.दररोज शाळकरी विद्यार्थी,कामावरून परतणारे नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावे लागत आहे.त्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेने ट्रॅक्टर चालक आणि मालकांमध्ये जनजागृती करावी.तसेच न ऐकणाऱ्या ट्रॅक्टरवर चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना निवेदन देऊन केली आहे.यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बनसोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे,सीए विनोद जैन, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गप्प गुप्ता, जहीर अहमद, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा बागडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले, संचालक अरुण गजभिये,राजीव ठाकरे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष रणजीत गणवीर,NSUI अध्यक्ष अमन तिघाला प्रामुख्याने उपस्थित होते.