संविधान जागर- संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
16

वाशिमदि. 14 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे संविधान जागर-संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत हे होते. उदघाटन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. मोहन गवई, जादूटोणा समितीचे अशासकीय सदस्य रामकृष्ण कालापाड, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस. खंडारे, जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधिक्षक सातार्डेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी उपस्थिती होती.

             ॲड. डॉ. गवई म्हणाले, भारतीय संविधान हे भारतातील सर्व नागरीकांसाठी आहे. संविधानाचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे नागरीकाला दिलेले मुलभूत अधिकार आहे. संविधानाने चार्तुवर्ण व्यवस्था मोडीत काढली. भारतीय संविधानाने सर्व नागरीकांना समानतेचा अधिकार दिला. विशेष करुन स्त्रीयांच्या हिताकरीता कायदे केल्याचे त्यांनी सांगीतले.

              डॉ. कालापाड म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी खुप मोलाचे कार्य केले आहे. सर्वांना समान अधिकार देण्याचे काम भारतीय संविधानाने दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावयाचे असेल तर संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

               श्री. खंदारे यांनी पीपीटीव्दारे सादरीकरण केले. सादरीकरणातून सर्व नागरीकांना देशाचा कार्यभार भारतीय संविधानाने चालतो. भारतीय संविधान आज पण सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. भारतीय संविधानाने नागरीकांना मुलभूत अधिकार दिले आहे. मतदानाचा अधिकार देखील भारतीय संविधानाने दिल्याचे त्यांनी सांगीतले.

                प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अमोल साळवे यांनी केले. आभार संतोष माहोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या मार्गदर्शनात राहुल चोंडकर, विजय भगत, गोविंद उगले, श्रीमती आर.एन. साठे, श्री. एस.एम. निमन तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.