Home विदर्भ आ.रहांगडालेंच्या हस्ते चिरेखनी येथे सीमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

आ.रहांगडालेंच्या हस्ते चिरेखनी येथे सीमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0

तिरोडा,दि.15:– तालुक्यातील चिरेखणी येथे दोन वर्षांपासून मुख्य गावातील रस्त्याची समस्या लक्षात घेत उर्वरित रस्ता बांधकामासाठी निधी मिळताच त्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.सन 2019 मध्ये स्थानिक निधीतून 7 लक्ष रुपये मंजूर केले होते. उर्वरित रस्ता निधीअभावी सन 2020 मध्ये पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सन 2020 मध्ये कोरोना जागतिक महामारीमुळे शासनाकडून निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे सदर काम प्रलंबित होते. त्यावर आमदार रहागंडाले यांनी जिल्हा वार्षिक निधी 3054 मध्ये चिरेखनी येथील उर्वरित रस्त्याकरिता 15 लक्ष मंजूर करवून घेतले.भूमिपूजन कार्यक्रमवेळी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे,जि.प.सदस्य पवन पटले,चत्रभुज बिसेन एड. माधुरी रहांगडाले,प. स. सदस्या सुनंदा पटले, ज्योती शरणागत,सरपंचा शिला पारधी, क्रूउबास संचालक घनश्याम पारधी,भाजपा उपाध्यक्ष संजय पारधी , तिरोडा शहर महामंत्री प्रकाश सोनकावळे,किसान आघाडी तालुकाध्यक्ष नितीन पारधी, नागेश तरारे,ग्रामपंचायत सदस्य सुरेन्द्र कोटागले,माजी सरपंच जगन्नाथ पारधी गुरूजी, खडकसिंग जगणे व गावकरी उपस्थित होते.

Exit mobile version