Home विदर्भ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू

0

गोंदिया ,दि.१२ :: प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या महिलेला शस्त्रक्रियेनंतर अतिशय त्रास होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारच्या सकाळी ९वाजता दरम्यान घडली.
कुंदा रविंद्र कामठे (२५)रा. टेमनी असे मृत महिलेचे नाव आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे त्या महिलेला असाह्य त्रास झाला. तिचा प्रथमोपचार मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तुमसर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले असता रस्त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला.
सदर घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी अकास्मिक मृत्युची नोंद केली आहे. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

Exit mobile version