जिल्हा परिषद ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कमलेश बिसेन यांची बिनविरोध निवड

0
85

गोंदिया,दि.18ः येथील जिल्हा परिषद ग्रामसेवक सहकारी पतसंस्था जिल्हा गोंदिया रंन.116 च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कमलेश बिसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पुन्हा त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.कोरोंनाकाळात निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती,परिस्थिती सामान्य होताच सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्फत निवडणुक निर्णय अधिकारी श्री माथूलकर यांनी निवडणुकीची प्रक्रीया पूर्ण केली.

गोंदिया जिल्हा परिषद ग्रामसेवसक सहकारी पत संस्था मर्या.गोंदिया.र.नं.116 च्या सन २०२२-२०२७ या कालावधी करीता संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली.त्यामध्ये नवनिर्वाचित संचालकांमध्ये कमलेश व्ही. बिसेन(अध्यक्ष),दयानंद जी.फटिंग(उपाध्यक्ष),भागेश्वर के.चव्हाण(खजिनदार),नरेद्र डी. अतकरी(तज्ञ संचालक),तारेश बी.कुबड़े(तज्ञ संचालक),कु.ज्योति ई.बिसेन(कार्यरत संचालक),रामेश्वर आर.जमाईवार(संचालक),रविन्द्र बी.अंबादे(संचालक), ओमेश्वर जी.बिसेन(संचालक),सचिन व्ही. कुथे(संचालक),निशा एम.टेंभरे(संचालक),सुरेंद्र एस. निघोट(संचालक) ,सुनील बी.पटले(संचालक),कु.सिंधु आर.सूर्यवंशी(संचालक)यांचा समावेश आहे.

अतिशय विपरित परिस्तिथीमध्ये ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकारी संवर्ग काम करीत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होतो. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून संवर्गच्या आर्थिक सामाजिक व मानसिक बळकटीकरणाकरीता ही संस्था स्थापित केली असून जिल्ह्यात लवकरच ग्रामसेवक भवनाची हक्काची इमारत उभी करून युनियन व संवर्गाकरीता सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यावर संवर्गाने दाखविलेला विश्वास मी प्रामाणिकपणे सर्वांना सोबत फलश्रुतीकडे निश्चित नेणार असून मी कार्यमात्र अध्यक्ष असून संस्थेतील सर्व सभासद अध्यक्ष असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष कमलेश बिसेन यांनी व्यक्त केली.