देवरीत हनुमान जयंती महोत्सवानिमित्त उसळला जनसागर

0
22

देवरी – येथील प्रभाग क्रमांक ०३ मधील संकट मोचन हनुमान मंदिरात १६ एप्रिल शनिवारला हनुमान जयंती महोत्सवानिमित्त हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी दोन वर्षांनंतर भाविकांचा जनसागर उसळून हजारो हनुमान भक्तांनी उत्साहात हनुमानाचे दर्शन घेतले. यावेळी सर्वच हनुमान भक्तांना महाप्रसाद आणि हनुमान चालीसा वितरण कार्यक्रम सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर हनुमान मंदिरात कोरोना लॉकडाऊनच्या आधी दरवर्षी सुद्धा हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत हनुमान जयंतीचा महोत्सव साजरा केला गेला आहे. परंतू , मागील दोन वर्ष कोरोनाच्या शासकीय बंधनामुळे मोठ्या थाटात हनुमान जयंतीचा कार्यक्रम घेता आला नाही. यावर्षी मात्र कोणतेही तेवढे बंधन नसल्यामुळे या संधीचा लाभ हनुमान भक्तांनी उत्साहात घेतला.
यावेळी प्रभू श्रीराम हनुमान भक्ताच्या दर्शनासाठी आलेल्या आजी, माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तांनी मंत्र मुग्ध होऊन कोचे बंधू , मिनाजी शर्मा, मिनाताई शर्मा आदींच्या गायनाच्या तालासुरात हनुमान पठनाचा आश्वाद घेतला. मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते दिनेश गोडशेलवार परिवार, राजकुमार शाहू परिवार, किशोर पटले परिवार, अग्रवाल फर्निचर परिवार यांच्या सहकार्याने महाप्रसाद आणि भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने यांच्याकडून नि: शुल्क हनुमान चालीसा भक्तांना भेट म्हणून देण्यात आल्या. चालीसा वितरणासाठी उपाध्यक्ष पियुष दखने, दिपक शाहू , प्रविण पाटील आणि हजारोंच्या संख्येत असलेल्या भक्तांची व्यवस्था सांभाळण्यासाठी प्रभाग क्रमांक तीन आणि चारच्या नागरीकांनी सहकार्य केले.