रब्बी धान पीक नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी : डॉ. रहांगडाले

0
42

तुमसर,दि.20ः- रब्बी धान पीक नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री किसान योजना व प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता नव्याने नोंदणीला सुरुवात करण्यात यावी. अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, अन्न नागरी आपूर्ती व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री आणि तहसीलदार तुमसर यांना दिलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सन २0२१ ते २0२२ च्या हंगामाकरिता रब्बी धान पिकाचे शेतकर्‍यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीकरिता नोंदणी करण्यासाठी ११ एप्रिल २0२१ ते ३0 एप्रिल २0२२ पयर्ंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु, या अल्पशा मुदतीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हे त्रासदायक ठरणार आहे. यात कधी पोर्टल बंद तर कधी ग्रामीण भागात नेट सुविधेचा अभाव हे कारणीभूत ठरत आहे. तर कधी तलाठ्याकडून सातबारा वेळेवर मिळत नाही त्यामुळे शेतकरी हे हतबल झालेले असतात.
अशावेळी त्या शेतकर्‍यांच्या मनात असंतोष खदखदत असतो. शेतकर्‍यांच्या भावना व गरजा लक्षात घेता रब्बी धान नोंदणीची मुदत ३0 मे २0२२ पयर्ंत वाढविण्यात यावी व प्रधानमंत्री सन्मान योजने अंतर्गत अर्थसहाय्य करिता शेतकर्‍यांसाठी नव्याने नोंदणीला सुरुवात करण्यात यावी. शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य लाभाकरिता नवीन पोर्टल सुरू करण्यात यावे. अशा या मागणीचे निवेदन तहसीलदार तुमसर यांचे मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे.
निवेदन देताना डॉ. हरेंद्र रहांगडाले, रामभाऊ बिसेन, बुधराज पटले, संजय टेंभरे, एन. बी. राणे व शेतकरी उपस्थित होते.