विभागस्तरीय पुरस्कारासाठी कटंगी व देवलगाव ग्राम पंचायतीची होणार तपासणी

0
35

*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
*२३ एप्रिल रोजी कटंगी तर २४ एप्रिल रोजी होणार देवलगाव ग्रामपंचायतीची तपासणी
गोंदिया- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२० अंतर्गत विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हातील कटंगी व देवलगाव ग्राम पंचायतीची तपासणी विभागीय स्तरावरील समितीकडून करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२० चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार कटंगीने तर द्वितीय पुरस्कार देवलगाव या ग्राम पंचायतीने पटकावला होता. त्यामुळे या ग्राम पंचायतीची विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली होती. त्या अनुषंगाने सहायक आयुक्त (विकास) यांच्या अध्यक्षेखाली विभागीय तपासणी समिती या ग्राम पंचायतीची तपासणी करणार आहे.२३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कटंगी तर २४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विभागीय तपासणी समिती वा गावांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत. विभागात प्रथम पुरस्कार १० लाख, व्दितीय पुरस्कार ८ लाखांचे तर तृतीय पुरस्कार ६ लाख रुपये आहे.