गौरेश बावनकर यांची तेली समाजाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

0
51

सडक अर्जुनी::– विदर्भ तेली महासंघाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्याची विस्तारित बैठक शुक्रवारला आयोजित करण्यात आली होती.बैठकीदरम्यान कोसमतोंडी येथील गौरेश यशवंत बावनकर यांना तालुका सडक अर्जुनीच्या तेली समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने आनंदराव कृपान विदर्भ तेली महासंघ जिल्हाध्यक्ष गोंदिया , शेषराव गिऱ्हेपुंजे युवा आघाडी अध्यक्ष,विदर्भ तेली महासंघ, राजू चांदेवार जिल्हा कार्याध्यक्ष, नारायणराव बावनकर जिल्हा सचिव,सुनील भिवगडे माजी अध्यक्ष ,वीरेंद्र भिवगडे, अनिल राजगिरे नगरसेवक सडक अर्जुनी ,महेंद्र वंजारी नगरसेवक सडक अर्जुनी , विजय बावनकर, विलास बागडकर, वंजारी सर, डा. गिऱ्हेपुंजे, आशिष येरणे, शेखर वंजारी, तेजू खोब्रागडे, रमेश लांजेवार, उमेश बोधनकर, व अनेक समाजबांधव उपस्थित होते.