31.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी प्रकाश तिवारी यांची निवड

मंडळ अधिकारी संघटनेच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी प्रकाश तिवारी यांची निवड

0
89

गोंदिया,दि.24ः-विदर्भ मंडळ अधिकारी संघ, नागपूर विभाग, जिल्हा गोंदियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बी. तिवारी यांची पुनश्च निवड करण्यात आली. आज 24 एप्रिल, 2022 रोजी पटवारी भवन, गोंदिया येथील सभागृहात झालेल्या आमसभेमध्ये प्रकाश तिवारी यांची पुन्हा मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदावर एकमताने नेमणूक करण्यात आली.यावेळी डी.एस.हत्तीमारे,बि.डी.भंडारकर,डी.एच.पोरचित्तीवर,एम.टी.मलेवार,बी.एन.वरखडे, एस.आय.पवार, ए.के.जांभुळकर, इत्यादी प्रामुख्याने हजर होते.