जिल्हा नियोजन समितीची सभा 30 एप्रिलला

0
23

गोंदिया,दि.28 : जिल्हा नियोजन समितीची सभा राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री गोंदिया प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.

          समितीच्या बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. 17 जानेवारी 2022 रोजी च्या इतिवृत्तास मंजुरी देणे व इतिवृत्तातील कार्यवाही मुद्द्याचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र 2021-22 अंतर्गत माहे मार्च 2022 अखेर झालेल्या खर्चास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंर्तगत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा माहे एप्रिल अखेर पर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे व अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.