चार नगर परिषदांच्या विकासकामांसाठी ७.३७ कोटीचा निधी

0
22

खा.प्रफुल पटेल यांची आश्वासनपुर्ती
भंडारा : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांची विकासकामे गेल्या ५ वर्षापासून खुंटली होती. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी शहराच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले होते. यानुरूप नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यातील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. यामुळे नगर विकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण लेखाशिर्षकातंर्गत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, पवनी व भंडारा नगर परिषदेकरीता ७ कोटी ३७ लाख ८० हजाराचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्टपूर्ण कामासह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. यामुळे भंडारा जिल्हावासीयांनी खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाशी पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क करून भंडारा जिल्ह्यातील नगर पंचायत व नगर परिषदांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यानुरूप नगरविकास मंत्रालयाने वैशिष्टपूर्ण व विशेष रस्ता अनुदान लेखाशिर्षकातंर्गत तुमसर, साकोली, पवनी व भंडारा या चार नगर परिषदांकरीता ७ कोटी ३७ लाख ८० हजार रूपयाचा निधी मंजूर केला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत पवनी नगर परिषदेकरीता २० लाख व भंडारा नगर परिषदेकरीता ३४ लाख 60 हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशेष रस्ता अनुदान या लेखाशिर्षकातंर्गत भंडारा नगर परिषदेकरीता ३ कोटी ८९ लाख व १ कोटी २४ लाख तसेच पवनी नगर परिषदेकरीता ४० लाख, तुमसर नगर परिषद ६५ लाख, साकोली नगर परिषद ६५ लाख २० हजार असा एकूण चारही नगर परिषदेकरीता विशेष रस्ता अनुदान अतंर्गत ६ कोटी ८३ लाख २० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वैशिष्टपूर्ण व विशेष रस्ता अनुदान या दोन्ही योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदांना ७ कोटी ३७ लाख ८० हजाराचा निधी मंजूर झाला आहे. हे खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित आहे. या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील पवनी, तुमसर, साकोली व भंडारा या चारही शहराच्या विकासकामांना गती मिळणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील शहराच्या विकासकामांसाठी माजी आमदार राजेंद्र जैन व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते हे विशेष.