तिसरे फुले- शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अरुणा सबाने

0
15
नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक अरुणा सबाने ह्यांची तिसऱ्या फुले शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड सर्वानुमते केली आहे.’सावित्रीने दिली अस्तित्वाची लेखणी म्हणून स्त्री झाली कर्तृत्वाने देखणी’ अशी लेखणीदात्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीची विदर्भात सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक ,सुप्रसिद्ध लेखिका आकांक्षा प्रकाशनच्या संपादक अरुणा पंजाबराव सबाने ह्यांची चंद्रपूर येथे रविवार दि ८ मे २०२२रोजी संपन्न होणाऱ्या तिसऱ्या फुले, शाहू, आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झालेली आहे .अलीकडेच ‘सूर्य गिळणारी मी’ हे अरुणा सबाने हयांचे आत्मकथन प्रकाशित झाले.18 पुस्तकांच्या धनी ,26 नामांकित पुरस्कारांच्या मानकरी,अनेक साहित्य संमेलनातं अध्यक्षपदाने सन्मानित असणाऱ्या अरुणा सबाने ह्या विदर्भातील पहिल्या महिला संपादक आहेत. दरवर्षी लिहित्या लेखिकांची कार्यशाळा अयोजीत करून नवोदितांच्या लेखणीला नवे आयाम देण्याचे प्रशिक्षण अरुणा सबाने करतात.
फुले ,शाहू ,आंबेडकरी विचारांची कास धरून अन्याय अत्याचाराविरुद्ध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी असणाऱ्या अरुणा सबाने यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड ही ओबीसी महिलांचा आत्मशोध घेणारी दिशादर्शक ठरेल .अरुणा सबाने यांच्या निवडीने साहित्य क्षेत्रात आनंदाचा सूर उमटला .निश्चितच साहित्यसंमेलनाला परिवर्तनशील विचारांकडे नेणाऱ्या अरुणा सबाने ह्याचे फुले,शाहू,आंबेडकर ओबीसी महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समिती च्या मुख्य प्रवर्तक प्राचार्य संध्या राजूरकर स्वागताध्यक्ष एड डॉ अंजली साळवे संयोजक प्रा माधुरी गायधनी, डॉ वीणा राऊत,माधुरी लोखंडे, आदींनी हार्दिक अभिनंदन
केले आहे.