माजी सैनिकाने केली सेवानिवृत्ती वेतनातून रस्ता दुरुस्ती

0
45

सालेकसा,Ex-serviceman तालुक्यातील झालियाजवळील गोंडीटोलाहून मोहाटोला गावाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासूनसू खराब झाला होता. या रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक
त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत गावातील माजी सैनिक मेहत्तर मरस्कोल्हे यांनी त्यांना मिळणार्‍या सेवानिवृत्ती वेतनाच्या रकमेतून रस्त्याची दुरूस्ती केली.तालुक्यातील गोंडीटोला हे 25-30 लोकवस्तीचे गाव असून गावापासून 200 मीटर अंतरावर शहराच्या पलीकडे 10-12 घरे आहेत. हा रस्ता पुढे मोहाटोलाकडे जातो . परंतु,या रस्त्याचे खडीकरण करण्यात आलेले नव्हते.ते त्यावर मुरूम सुद्धा टाकले जात नव्हते.ते परिणामी, गावकर्‍यांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडे
गावकर्‍यांनी विनंती केली. परंतु,यानंतरही रस्ता दुरुस्तीसाठी कुणीच लक्ष दिले नाही.Ex-serviceman केंद्रीय राखीव पोलिस दलातून झालेल्या मेहत्तर मरस्कोल्हे स्वेच्छा सेवानिवृत्त होऊन मागील वर्षी आपल्या गावात परतले. गावात जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांना चांगलाच संताप आला . या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून त्यांनी अनेकांकडे पाठपुरावा केला. मात्र, यानंतरही कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या पेन्शनची रक्कम खर्च करून 100 मीटर रस्ता तयार केला. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे गावकर्‍यांनी कौतुक केले.
लोकप्रतिनिधींनी फिरविली होती पाठ
गोंडीटोला रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून गावकर्‍यांनी लोकप्रतिनिधीच्या घरच्या पायर्‍या झिजवल्या. परंतु,कुणीच त्याची दखल घेतली नाही. अखेर माजी सैनिकाने स्वतःच्या पेन्शनच्या रकमेतून
100 मीटर रस्त्याची दुरुस्ती केली. यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींना पाझर फुटणार का, असा सवाल उपस्थित केला जात आह.