विशेष कामगिरीसाठी 18 पोलिसांचा गौरव

0
35

गोंदिया- पोलिस विभागात कर्तव्र्यावर असताना उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या जिल्ह्यातील 19 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सन 2021 या वर्षाकरिता 30 एप्रिल रोजी उत्कृष्ट कार्य करणार्‍या पोलिसांसाठी सन्मानचिन्ह यादीत जाहीर केली. यात जिल्ह्यातील 2 अधिकारी व 16 पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यात आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदरलिं नालकूल, पोलिस निरीक्षक प्रमोद घोगे, पोलिस हवालदार राष्ट्रपाल तुमडाम, रेखा धुर्वे, राजेश पटले, गुन्हे
अन्वेषण विभागाचे निशिकांत लोंदासे, मनोहर चांदेवार, पोलिस नायक शिपाई दीपक सांदेल, पंकज चंद्रिकापुरे,धनराज डाहारे, नरेंद्रकुमार राऊत, संजय महारवाडे,चंद्रशेखर गणवीर, खेमराज कोरे, संतोष शेंडे,सचिन चव्हाण, रमेश उईके व दीपक क्षीरसागर यांचा समावेश आहे.