भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात १५ कामांना १५० लक्ष रुपये मंजूर

0
60

रस्ते, सभामंडप बांधकाम : एकूण १५ कामांचा समावेश : प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर मंजुरी

भंडारा : – भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत जिल्हयातील १५ कामांसाठी १५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत . राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूजित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा / गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरून मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अशी राज्यस्तर योजना सन २०१८-१९ पासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .
सदर योजनेमध्ये घ्यावयाच्या कामांमध्ये वाढ करून त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींशी निगडीत स्थळे तसेच , सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे , त्यांची स्मारके उभारणे व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा सांस्कृतिक विकास घडवून आणणे ( उदा . वाचनालय , अभ्यासिका , घम्म केंद्र , विपश्यना केंद्र , प्रशिक्षण केंद्र ) या कामांचा समावेश आहे . सदर कामे मंजूर कालावधीतच पूर्ण करायचे आहेत .

* ही कामे झाले मंजूर*

दिघोरी ता . लाखांदूर येथे बिलास मेश्राम ते यशवंत चिमनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली कव्हर सहीत बांधकाम करणे , जमनापुर ता . साकोली येथे वाल्मिक बांबोर्डे ते ललिता राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , दिघोरी ता . लाखांदूर येथे तुळशीराम नंदागवली ते माधव कटारे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली कव्हर सहीत बांधकाम , शहापुर ता . भंडारा गणेश वार्ड येथे मनोज गजभिये ते जितु बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , मौजा जांभळी / खां . ता . साकोली येथे विलास मेश्राम ते नाल्या पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , खोकरला ता . भंडारा येथे सुनंदाबाई कडवे ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , पिंडकेपार ता . साकोली येथे शिवदास घोंडगे ते सुखदेव वालदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , बेला येथे लुंबिनी बौध्द विहारा समोर सभामंडप बांधकाम करणे , सितेपार / विस ता . भंडारा येथे लेकचंद टेभुर्णे ते रेवाचंद इंदलकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , डोडमाझरी येथे महेन्द्र सिंगाडे ते रमन नडंगे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम , बेला येथे लुम्बीनी बौध्द विहार परिसरात सुशोभिकरण व सभामंडप बांधकाम करणे , पळसगांव / कोलारी येथे समाज मंदिर बांधकाम करणे , गुरढा येथे बौध्द विहार परिसरात सुशोभिकरण करणे , पेंढरी येथे रामदास तिरपुडे ते रविंद्र खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे , व मांगली / बांध येथे बौध्द विहार परिसरात सुशोभिकरण व पेव्हींग ब्लॉक बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे .