दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव उपकरण तपासणी शिबिर

0
31

गडचिरोली-जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व अलिम्को कंपनी मुंबई, जनरल इन्श्युरंस कंपनी मुंबई यांच्या सहकायार्ने 0५/0५/२0२२ रोजी एकलव्य हॉल,पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पार पडला.
सदर दिव्यांग तपासणी शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगानी आपली तपासणी करून घेतली. त्यापैकी २६0 दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरलेले आहेत. ज्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव उपकरणाचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवुन देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु.आजपयर्ंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर राबवुन ९८0 दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, ६५0 दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, २७६ दिव्यांगांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नसिर्ंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी २९६,ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट ३८, फील्डऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४७३ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अहेरी), मा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरीअनुज तारे कमलेश यादव सी.एस.आर. कन्सलटंट, अलिम्को मुंबई, डॉ. सतिश गोगुलवार संस्थापक, संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. भावेश कावरे व त्यांचेसर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोलीस उपविभाग, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी व पोलीसअंमलदार अथक पर्शिम घेतले.