**पंकज रहांगडाले – मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार
गोंदिया,दि. 26 मे – कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया द्वारे कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात नवनियुक्त जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक/कर्मचारी/अधिकारी व विद्यार्थ्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी निवेदन देण्यात आले. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.
प्राथ.शिक्षक/माध्य.शिक्षक/उच् च माध्य.शिक्षकांची बिंदू नामावली निश्चित करणे, उ.श्रे. मुख्या/माध्य.मुख्या/केंद्र प्रमुख/ शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नती ने भरणे,भारतीय संविधान उद्देशिका जिल्हा परिषदेत दर्शनी भागात लावणे, सर्व शाळेतील विद्युत बिल ग्रामपंचायत ने भरण्या संदर्भात कार्यवाही कारणे, सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वितरित करणे, रिक्त असलेले विज्ञान/भाषा/सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांची कार्यशाळा घेणे, स्थायीचे प्रस्ताव निकाली काढणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन अंशराशिकरण, उपदान,गटविमा राशी, रजा रोखिकरण, भ.नि.नी. अविलंब देण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संगणक परीक्षा अतीप्रदान वसुली होऊ नये, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देणे,एन.पी.एस. मध्ये खाते उघडलेल्या शिक्षकांचे डी.सी.पी.एस. कपातीची रक्कम एन.पी.एस. खात्यात वर्ग करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.
या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, भरत वाघमारे, राजेंद्र खोब्रागडे, हितेंद्र रामटेके, सिद्धार्थ भोतमांगे, का.शि. संघटनेचे वीरेंद्र भोवते, किशोर डोंगरवार, उमा गजभिये, रोशन गजभिये, दीक्षांत धारगावे, अमित गडपायले, राजेंद्र सांगोळे, जितेंद्र बोरकर, राजेश साखरे, संजय रामटेके, अजित रामटेके, नरेंद्र मेश्राम, अजय शहारे, आशिष रंगारी, तेजराम गेडाम, जगदीश मेश्राम, नागेंद्र खोब्रागडे, आशिष वंजारी,अनमोल उके, आर.आर नंदेश्वर उपस्थित होते.