मेडिकल कॉलेजकरिता डॉ. आमटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा

0
23

गडचिरोली-राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज रद्द करू नये प्रथमत: मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण करावे, याकरिता आपल्या स्तरावरून शासनाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा, अशी विनंती करणारे पत्र आमदार डॉ. देवराव होळी यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसाचे प्रमुख पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना दिले.
यावेळी डॉ. प्रकाश आमटे केरळच्या प्रवासात असल्याने त्यांच्या वतीने डॉ. अनिकेत आमटे यांनी आमदाराचे पत्र स्वीकारले. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी त्यांच्याशी चर्चा करतांना गडचिरोली जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या शासनाच्या प्रयत्ना संदर्भात आमटे कुटुंबियांना अवगत केले. प्रथमता जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची आवश्यकता असून त्यानंतर मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी आपली भुमिका असल्याचे स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरिबांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने प्रथम मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे. करिता ती प्रक्रिया शासनाने पूर्ण करावी याकरिता आमटे कुटुंबीयांतर्फे शासनाकडे पत्र व्यवहार व पाठपुरावा व्हावा, अशी विनंती त्यांनी या भेटीदरम्यान केली.