गोंदिया,दि.29ः :– गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेल्या आणि नागरिकांंना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदी पुनरुज्जीवनसाठी आपला मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण पुढाकार घेत असल्याची घोषणा केंद्रीय जलसंशाधन,नदी विकास व रस्ते,परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली.पांगोली नदी बचाव संघर्ष समितीच्यावतीने खासदार सुनिल मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांच्यामार्फेत दिलेल्या निवेदनावर येथील भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
सोबतच या नदीच्या उगमस्थानापासून तर शेवटच्या टोकापर्यंत नदीपात्राचे विस्तारीकरण आणि साचलेला गाळ काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम वापरासाठी योग्य असल्यास त्याठिकाणी वापरण्याबाबत आपण आजच संबधितांना निर्देश देत आहोत,फक्त आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांनी आम्हाला तसे पत्र उपलब्ध करुन द्यावे असे प्रतिपादन गडकरी यांनी व्यक्त केले. गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल पटांगणात आयोजित महामार्ग , रस्ते भुमीपुजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मा.श्री नितिन जी गडकरी यांनी आपल्या भाषणात गोंदिया जिल्ह्यातील नागरिक शेतकरी व सामाजिक संस्थांची मागणी लक्षात घेता पांगोली नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.खासदार सुनिल मेंढे यांनी आपल्या भाषणातून पांगोली नदी पुनरुज्जीवनाचा विषय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी संस्था व पांगोली नदी वाचवा अभियान कृती समितीच्या निवेदनावर आणून दिले.निवेदन देतेवेळी समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्थेचे सचिव तिर्थराज ते.उके,दिपक कदम,अनिल शरणागत,रामनाथ बिसेन,योगेश चौधरी,राजेंद्र जगताप,मिलन रामटेककर आदी उपस्थित होते.