पाटणा येथे “लोक शिखर” सन्मानाने कवी अॅड.देवेंद्र चौधरी सन्मानित

0
18

तिरोडा : तिरोडा येथील सुप्रसिद्ध कवी, गजलकार आणि लेखक अॅड.देवेंद्र चौधरी यांना पाटणा येथे आयोजित साहित्याचे कार्यक्रमात “लोक शिखर” सन्मानाने सन्मानित करण्यात आले.पाटणा येथे २९ मे २०२२ रोजी “लोकोउत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिरोडा येथील सुप्रसिद्ध कवी, गजलकार आणि लेखक अॅड.देवेंद्र चौधरी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल बिहार राज्याची नामांकित संस्था ‘लोकहित सेवा संस्थान व दैनिक दस्तक प्रभात’ यांच्या संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रमात त्यांना नामांकित असा “लोक शिखर सन्मान” या सन्मानाने बिहार राज्याचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार,  बिहार राज्याचे माजी मंत्री तथा पाटणा साहिबचे आमदार नंदकिशोर यादव, पाटणाच्या महापौर सीता साहू व अन्य अतिथी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.