डिसेंबरमध्ये पूर्ण होणार रोहा-मुंढरी पुलाचे काम

0
39

मोहाडी-बहुप्रतीक्षीत वैनगंगा नदीवरील रोहा-मुंढरी पुलाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असून वाहतुकीस खुला होणार आहे. या पुलामुळे २५ किलोमीटरचे अंतर कमी होणार असून वेळही वाचणार आहे.
सुमारे ५५0 मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामात २३ खांब असून १२ खांबावर १00 फुट लांब व ६ फुट रुंद ग्रेडर्स मांडण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत ११ खांबावरील ग्रेडर्स टाकण्याचे काम डिसेंबरपयर्ंत पूर्ण होईल अशी माहीती राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे उपविभागीय अभियंता भाऊदास पिपरेवार यांनी दिली आहे.
जीवनदायीनी वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुका दोन भागात विभाजित आहे. नदीवर तुमसर तालुक्यातील माडगी येथे पूल असल्याने पूर्वेकडील करडी परिसरातील व तिरोडा तालुक्यातील नागरिकांना मोहाडी व भंडारा येथे जाण्यासाठी तुमसर शहराला वळसा घालावा लागतो. यामुळे वेळ व इंधनाचा खर्च वाढतो. शिवाय कामे वेळेत होत नसल्याने मानसीक त्रासही सहन करावा लागतो. वैनगंगा नदीवर निमार्णाधीन पुलामुळे मोहाडी तालुक्यासह भंडारा, तुमसर तिरोडा तालुक्याची मोठी अडचण दूर होईल. सुमारे २५ किलो मीटरच्या अंतराच्या इंधन खर्चात बचत होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी युती सरकारच्या कार्यकाळात प्रसाशकीय तांत्रिक मान्यता प्राप्त झाली होती. तत्कालीन आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांतून निधी मंजुर होण्यास मदत झाली होती. परंतू सत्ता परिवर्तनानंतर आ .राजू कारेमोरे यांनी वेळेत कामे होण्यासाठी तसेच निधी उपलब्ध होण्यासाठी ताकत लावली .कंत्राटदारास वेळेत काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले. वेळोवेळी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.