बालकल्याण समिती जिल्हा सदस्यपदी प्राचार्य मनोजकुमार रहागंडालेंची निवड

0
38

गोंदिया,दि.05ः राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्हास्तरावरील जिल्हा महिला व बालकल्याण(मुलांची काळजी व सरंक्षण)समितीच्या सदस्यपदी आदर्श शिक्षक व तालुक्यातील कंटगी कला येथील विमलताई ज्युनियर काँलेजचे प्राचार्य मनोजकुमार लिखन रहागंडाले यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य 2 सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.महिला व बाल कल्याण ( मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गोंदिया जिल्हा महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य पदावर 3 वर्षाकरिता ही निवड झालेली आहे.त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.