आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

0
14

गोरेगांव,दि.06- तालुकातील मोहाडी येतील आदर्श सार्वजनिक वाचनालय तालुका अ दर्जा ग्रंथालय येथे आज 6 जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले हे होते. तर प्रमुख अतिथि संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डि.चौरागडे,संस्थेचे सदस्य जे.जे.पटले, हिरालाल महाजन, देवदास चेचाने, सुभास चौरागडे, परमानंद तिरेले,माजी सरंपच धुर्वराज पटले,आदी उपस्थित होते. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी सांगतिले कि रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा यांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानी केलेला राज्यकारभार, परकिय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी,वतनदाराशी अनेक लढाया,युध्दे लढुन या महाराष्ट्र भुमित स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषांच्या लोककल्याणकारी स्वराजतील महत्त्वाचा ,स्वराज्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे ६ जून १६७४म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता.
या कार्यक्रमाला दुर्गेश चेचाने, कुल्लु वरखडे,आशा चेचाने, वैशाली चौरागडे,प्रवीन येरखडे आदी नी सहकार्य केले
कार्यक्रमाचे प्रस्थाविक, संचालन नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले.