जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक दिन साजरा

0
16

वाशिम दि.६ – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम येथे आज ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.एच. कोलते, ज्येष्ठ पत्रकार सुनील कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जी.बी बेंद्रे, कनिष्ठ लिपिक एस आर कंडारकर, विलास कांबळे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुरेश खिल्लारे, सुनील धुर्वे, गणेश भादुर्गे, शैलेश शिरसाट, छगन चव्हाण, प्रवीण भगत,कविता खिल्लारे, प्रगती गायकवाड,आरती गिरी,कविता खिल्लारे यांचेसह अनिल कुरकुटे, गजानन डहाके व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आयोजित करण्यात आलेला ग्रंथ प्रदर्शनात स्वराज्यातील दुभळी,स्वराज्याचा श्री गणेशा, स्वराज्यावरील संकट, पेशवे घराण्याचा इतिहास, राजेश्री, शिवकाशी,स्वराज्याचे परिवर्तन, छत्रपती शिवाजी महाराज, श्री राजा शिवछत्रपती आणि श्रीमान योगी इत्यादि ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.