
पवनी /धाबे इथं शिवस्वराज्य दिन उत्साहात
अर्जुनी /मोर ता 6:- तालुक्यातील पवनी /धाबेच्या ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राजदंड उभारून गुढी उभारण्यात आली. दरम्यान रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला फुलेवाहून सरपंच पपीता ताई नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, सदस्य सौ. दीपिका चुटे,सौ सुशी मडावी,सौ सुनंदा कवडो, श्री कैलास पंधरे आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी विनम्र अभिवादन केलं. ग्रामरोजगार सेवक देवकुमार हटवार यांनी गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गौरवपर गीत सादर केलं. शिवाजी महाराजांचा जयजयकार करून आजच्या दिवसाचे महत्व पटवून देण्यात आले . दरम्यान राष्ट्रगीताने या कार्यक्रमांची सांगता झाली.
ककोडी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ध्वजारोहण
ककोडी- देवरी तालुक्यातील ककोडी ग्रांम पंचायत कार्यालयात आज सोमवारला ६ जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.हिंदवि स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्टाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्यभिषेक सोहळा आज संपुर्ण राज्यात साजरा केला जात आहे.
ककोडी ग्रां, पं, सरपंच मीनाताई मडावी यांच्या हस्ते ध्वजपुजण करूण ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणाला उपसरपंच भैयालाल जाभुळकर, ग्रां.प सदस्य मनिषा धरमगुडे, रियाज खान, शामलाल कपुरडहेलिया, हर्षिला जाभुळकर , कु . हिमानी काशीम , सचिव समिर बडगे, तिलक राऊत, गेंदलाल अंबादे आणि गावकरी उपस्थित होते.