पदोन्नती आदेशानंतरही रुजू होण्यास टाळाटाळ,विभाग बदलाचे वारे

0
40

गोंदिया,दि.06ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कनिष्ट सहायकांच्या पदोन्नत्या करण्यात आल्या.11 कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ सहायकपदावर 26 मे रोजी पदोन्नतीचे आदेश देऊनही आजपर्यंत कुणीही रुजु न झाल्याने पदोन्नतीनंतरी विभाग बदलासाठी कर्मचारी हेरझारे घालत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार जो व्यक्ती ज्या विभागात आधी राहिलेला आहे,त्यास पदोन्नतीनंतर तो विभाग वगळून इतर विभाग देणे गरजेचे असते मात्र या गोष्टीला फाटा दिले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.त्यातच काही पदोन्नती आदेशात फेरबदल होण्याची चर्चा सुरु झाली आहे.