आझाद लाइब्रेरी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
12

गोंदिया, दि.६ – आझाद लाइबेरी सार्वजनिक ग्रंथालय, गोंदिया येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रँथपाल अधिकारी श्रीमती रिजवाना शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रंथालयचे पाठकगण, वाचक, संस्था पदाधिकारी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी आयोजित करण्यात आलेला ग्रंथ प्रदर्शनात स्वराज्यातील दुभळी, स्वराज्याचा श्री गणेशा, स्वराज्यावरील संकट, पेशवे घराण्याचा इतिहास, राजेश्री, शिवकाशी, स्वराज्याचे परिवर्तन, छत्रपती शिवाजी महाराज, श्री राजा शिवछत्रपती आणि श्रीमान योगी इत्यादि ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
या कार्यक्रमात निबंध स्पर्धाचे ही आयोजन केले होते त्याचा विषय श्री छात्रपति महाराज म्हणजे राजे आणि लोकशाही पद्धतिने राज्यकारभार होता

या वेळी लाइब्रेरी चे अध्यक्ष श्री जब्बार खान जिलानी , सचिव श्री जफर खान , खालिद पठान, जाहिद खान, हुसैन शेख, जैकी वैष्णु, राजेश सराते, अभिषेक पटले, राखी उके, प्रीतेश नारनवरे, आकिब शेख, हर्षल देशकर, अभिषेक मेश्राम, प्रतीक बसोड़, मनीषा भूते, अफ़ज़ल कुरैशी उपस्थित होते.