HSC Result : बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता

0
59

-शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल.”

 

उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.