वैद्यकीय महाविद्यालयाच्या वीज पुरवठा कक्षाला आग

0
40

गोंदिया,- स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वीज पुरवठा कक्षाला 8 जून रोजी शॉटसर्कीटमुळे आग लागली. मात्र कर्तव्यारील सुरक्षारक्षक तसेच खासगी रुग्णवाहिणी चालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.रुग्णालयातील जनरेटर, ऑक्सिजन प्लांट, लिफ्ट, अधिकारी व कर्मचार्‍यांचे कक्ष, औषधी भांडारला लागून असलेल्या वीजपुरवठा कक्षातून दुपारच्या सुमारास धूर व जळाल्याचा वास येत असल्याचे लक्षात येताच कर्तव्यावरील सुरक्षारक्षक व खासगी रुग्णवाहिका चालकांनी धाव घेत वीजपुरवठा कक्ष गाठले असता कक्षाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वीज पुरवठा कर्मचार्‍यांना माहिती दिली. दरम्यान वीज पुरवठा कर्मचारी व खासगी रुग्णवाहिणी चालकांनी रुग्णालयात अग्निशामक सिलेंडरच्या सहाय्याने वेळीच आगीवर ताबा मिळविला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे काही काळ रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते.