बालाघाट जिल्ह्यात 11 ला तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 12 जून रोजी होणार सारस गणना

0
39

गोंदिया,दि.10ः विदर्भातील भंडारा व गोंदिया आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 11  जूनपासून सारस पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. 12 जूनपर्यंत ही गणना सुरू राहणार आहे.

वन विभाग आणि सेवा संस्थेच्या वतीने गणनेचे अभियान राबविले जाणार आहे. 11 जून रोजी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात तर 12 जून रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात गणना होईल. याशिवाय इतर आवश्यक ठिकाणी भेटी देऊन ही गणना केली जाणार आहे. गणनेत ६० ते ७० सारस मित्र, शेतकरी आणि सेवा संस्थेचे सदस्य,40-50 गोंदिया,बालाघाट येथील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.सेवा संस्था गोंदियाच्या मार्गदर्शनात ही गणना होणार असल्याची माहिती सावन बाहेकर यांनी दिली. दरवर्षी पूर्व विदर्भात अशा प्रकारची गणना केली जाते.