* ▶️बीटेखारी येथे वाघाने केली डुकराची शिकार
* ⏩वन विभागाच्या दलाने गर्दी हटवली
* ⏩परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण
✍️विपुल परिहार/मोहाडी – तालुक्यातील जाम कांद्री शेतशिवारात 14 जून रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच वाघाने बिटेखारी या परिसरात रानडुकराची शिकार केल्याचे दिसताच नागरिकांनी वाघाच्यामागे हल्लाबोल केला. आणि यातच या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेला आहे.
जाम-कांद्री हे गाव गायमुख तीर्थक्षेत्र दाट जंगल व्यापी परिसराशी जुडलेला असून या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. आणि यातच पट्टेदार वाघ सुद्धा या परिसरात शिकार करण्यासाठी जंगलापासून ते गावापर्यंत पोचत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच जाम कान्द्री परिसरात बीटेखारी या शेतशिवारात पट्टेदार वाघाने एका रानडुकराची शिकार केली होती.ते शिकार खाण्यासाठी आज घटनास्थळी आला असता पट्टेदार वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना झाले.या घटनेची माहिती वन विभागाला दिली.पाहता पाहता संपूर्ण गावातील लोक वाघाला शोधण्यासाठी गेले तेव्हा वाघ दिसताच त्यांनी वाघाच्यामागे हल्लाबोल केला.
” आज सकाळी जो पट्टेदार वाघ नागरिकांना दिसला. तो आपली शिकार नेण्याकरिता आला होता. परंतु नागरिकांनी त्याला पळविण्याच्या नादात नागरिक लाठी व काड्या घेऊन त्याच्यामागे धावल्याने तो पळाला. परंतु तो वाघ त्या परिसरातच आहे. तरी नागरिकांनी याबाबत शांतता बाळगून सतर्क राहण्याची गरज आहे.
के . जी राठोड
वन परिक्षेत्र अधिकारी जाम कांद्री