जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदात्यांचा सत्कार

0
16

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व बाई गंगाबाई रक्तकेंद्र येथे कार्यक्रम


गोंदिया, दि 15:
भारतीय स्वातत्र्यांचा अमृत महोत्सव व जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून 14 जून रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व बाई गंगाबाई रक्तकेंद्र गोंदिया येथे अधिष्ठाता, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ अपूर्व पावडे, डॉ. शैलेंद्र यादव, डॉ. संजय चौव्हान, डॉ. अमित जोगदंडे तसेच गोंदिया जिल्हयातील विविध संस्था व नियमित रक्तदाते यांचे प्रमुख उपस्थितीत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील कर्मचा-याचे रक्तदान शिबीर व रक्तदात्याचे सत्कार कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतानी अधिष्ठाता, डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. रक्तदान हे महादान असून रक्तदान करून आपण ब-याच लोकांचे प्राण वाचवू शकतो. जनसामान्यात रक्तदाना विषयी भ्रामक संकल्पना रक्तदात्यांच्या माध्यमातून दुर करून सामान्य जनतेला रक्तदान करण्याकरिता प्रोत्साहित करावे तसेच या प्रसंगी जिल्हयातील विभिन्न महाविद्यालयातील विद्यार्थ्याना व विद्यार्थ्याच्या संघटनांना या माध्यमातून आवाहन करण्यात आले की, रक्तदान शिबीर आयोजीत करावे. या प्रसंगी 15 ते 20 वेळा नियमित रक्तदान करणा-या 25 रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गोंदिया येथील कर्मचारी शिवम घारड, रोशन भगत व पियूष सरोदे यांनी रक्तदान केले. सदर कायक्रमाचे संचालन डॉ. पल्लवी गेडाम, रक्त संक्रमण अधिकारी व आभार प्रदर्शन अजय डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्रीमती प्रेरणा धनविर समाजसेवा अधिक्षक यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरिता रक्तकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच छायाचित्रकार व कलाकार शैलेंद्र बन्सोड यांनी मोलाचे सहकार्य केले.