गोंदिया,दि.16ः तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसंघाच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती बागेले होत्या.तर पाहुणे म्हणून उपसरपंच धनजंय रिनायत,उमेद प्रभाग समन्वयक भावे,कृषी,मत्स्य,आरोग्य,पशुपालन विभाग आणि एचडीएफसी बँकेचे कर्मचार्यांचा संयुक्त विद्यमाने ही आमसभा पार पडली.आयोजनासाठी प्रेमशिला पारधी,ममता रिनायत,वीणा पटले,कविता नगरे,शिल्पा कटरे,स्वाती पारधी,डिलेश्वरी रिनायत यांनी परिश्रम घेतले.