विनोद सुरसावंत/ककोडी,दि.16ः.देवरी तालुका आदिवासीबहुल व अतिसंवेदनशिल असून अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे.शासन ग्रामपंचायतीच्या माध्यमाने विकासाची कामे करण्यात येत असली तरी चिल्हाटी ग्रामपंचायतीच्यावतीने या विकास कामातच नियमबाह्यपणे काम करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मनरेगाच्यावतीने विविध कामे सुरु असून चिल्हाटी ग्रामपंचायतीला 25 लाख रुपयाच्या निधीचे खळीकरणाचे काम मंजुर झाले.त्या रस्त्यांचे काम ग्रामपंचायतीने खासगी कंत्राटदाराला दिले असून शासनाच्या अंदाजपत्रकानुसार(ईस्टीमेट)प्रमाणे न करता दगड/मुरुम घालून मोठ्याप्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नागरिकांनी म्हटले आहे.या कामाची तक्रार पंचायत समितीच्या सभापती अंबिकाताई बंजार यांच्याकडे करण्यात आली आहे.खळीकरणाच्या कामात ज्या दगडाचा वापर करण्यात आला आहे,त्यामुळे रस्ता उंच होणार असून पावसाळ्यात त्या रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.