
गोंदिया :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आरटीएम) विद्यापीठ सिनेट निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची बैठक युवा ग्रेजुएट फोरम च्या वतीने गोंदिया येथील विश्रामगृहात शनिवार, दि.18 जून 2022 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी पदविधर मतदार संघाची निवडणूक प्रबळतेने लढलेले युवा ग्रेजुएट फोरम प्रमुख अतुल दादा खोब्रागडे (नागपूर) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्यापीठीय सिनेट निवडणुकीबद्दल युवा वर्गात जागृती निर्माण करणे, पुरोगामी विचारसरणीच्या विविध समविचारी संघटनांना घेऊन एकजुटीने निवडणूक लढवणे, त्यासाठी अधिकाधिक पदविधारकांची नोंदणी करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. या सभेत सर्व घटक, समाज संघटन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा ग्रेजुएट फोरम, संविधान मैत्री संघाने केले आहे.