
सडक अर्जुनी,दि.18 ::-गोंदिया जिल्ह्यातीस सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा सालेधारणी येथे लीला योगराज हिडामे वय ४० वर्ष ही महिला स्वतःच्या शेतात पेरणी करत असताना अचानक आलेल्या पावसासोबत विज अंगावर पडल्याने सदर महिलेचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली.
गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.
सदर महिलेला 2 मुले आहेत. शासना कडून मृत्यू झालेल्या महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सालेधारणीचे संतोष पाटील, गोंडवाना समाज चे गोंदिया जिल्हा प्रमुख भारत मडावी यांची केली आहे.