अर्जुनी मोरगाव,दि.१८ ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज शनिवार(दि.18) अचानक भेट देत पाहणी केली.तसेच आरोग्य केंद्रातील समस्यांची जाणीव करुन घेतली.भेटीदरम्यान रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांशी हितगुज साधले.तसेच त्यांना योग्य औषधोपचार करण्याची सुचना उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिली.यावेळी योगेश नाकाडे,दिनदयाल डोंगरवार उपस्थित होते.
यावेळी रूग्णालयातील औषधांचा साठा तपासणी,बाह्य रूग्ण व आंतररुग्ण विभागाची तपासणी करण्यात आली.याप्रंसगी वैद्यकीय अधिकारी डॉ पिंकुजी मंडल, डॉ.राहुल कापगते, डॉ.नितु पारधी व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.