ओबीसीच्या वतीने लोकप्रतिनिधींना जवाब दो आंदोलन

0
20

बीपीएसएस व ओबीसी जनमोर्चाचा मुख्य सहभाग

यवतमाळ :- राज्य सरकारने निर्माण केलेल्य समर्पित आयोगासमोर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आपले म्हणणे मांडले नाही ,ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांना फक्त ओबीसीचे मतच पाहिजे का , व इतर काही प्रश्न घेऊन जबाब दो आंदोलन 19 जून रोजी करण्यात आले.
यामध्ये केंद्र सरकारने 2021 जनगणना का केली नाही ? ओबीसीची जातिनिहाय जनगणना का होत नाही ?ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा खून कोणी केला ? ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत? ओबीसींना घटनाबाह्य क्रिमीलेअर ची अट का लावली ?लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण का मिळत नाही? यवतमाळ जिल्ह्याच्या ओबीसी चेआरक्षण 14 चे 17 झाले आता ते 19 टक्के करण्याकरीता लोकप्रतिनिधी का बोलत नाही? बनावट दाखले काढून पद भूषविणाऱ्या लोकप्रतिनिधींना शासन का केले जात नाही ?याशिवाय इतर प्रश्न घेऊन ओबीसी बांधवांनी यवतमाळ येथे खा. भावना गवळी यांचे कार्यालयात , आ. अशोक उईके यांचे कार्यालयात निवेदन दिले.
इतर खासदार व आमदार यांचे पीए यांनी निवेदन स्वीकारले , निवेदन देताना डॉ. ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष बीपीएसएस, उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा, विलास काळे उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा ,जिल्हा अध्यक्ष प्रमोद राऊत ,विदर्भ अध्यक्ष सुनीता काळे ,रवी नागरीकर ,गजानन गुल्हाने संजय बारी , ॲड. अरुण मेहेत्रे, अशोक मोहुरले ,ज्ञानेश्वर रायमल, किशोर बागवाले , विनोद इंगळे, राहुल पाचघरे ,अरुण कपिले, प्रा.काशिनाथ लाहोरे ,नीता दरणे ,माधुरी फेंडर,शैलेश येडे ,शशिकांत लोळगे ,अनिता गोरे ,वैशाली फूसे ,प्रा.दीपक वाघ, पवन थोटे , सुरेश वडतकर ,अभि. अरुणकुमार सांगळे, संजय राजगुरे, साहेबराव पारूदे ,मोरेश्वर वानरे ,वासुदेव खेरडे ,शशिकांत फेंडर, मायाताई गोरे संतोष झेंडे ,आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.