प्रगतीशील शिक्षण संस्थेची कार्यकारिणी गठीत

0
26

गोंदिया : स्थानिक प्रगतीशील शिक्षण संस्थेची कार्यकारिणी १९ जून रोजी पोवार बोर्डिंग येथे आयोजित बैठकीत घोषित करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुरेश भक्तवर्ती, उपाध्यक्षपदी शिशिर कटरे तर सचिवपदी किशोर भगत यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यात समाजाची एकमेव असलेली संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. सद्या चुटिया येथे संस्थेच्या वतीने संचालित शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. या शिवाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून समाजहित जोपासण्याचे काम करण्यात येते. त्यातच सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षीय कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक संजय रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात कार्यकारिणीची बिनविरोध निवड पार पडली. कार्यकारिणीत क्रुमराज चव्हाण, युगराज सोनवाने, सौ. डॉ. छाया पटले, सौ. चेतना चव्हाण, सौ. सोनाली रहांगडाले, विना चौधरी, दुर्गा ठाकरे, छत्रपाल चौधरी यांची निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचे पवार प्रगतीशील मंच तथा समाजातील कार्यरत विविध संघटनांनी या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे.